शाळेत नाव, जन्मतारीख चुकली; दहावीपर्यंत करू शकता दुरुस्ती विद्यार्थ्यांच्या शालेय नोंदीमध्ये पहिली ते दहावीच्या वर्गापर्यंत बदल करण्याची निर्णयाक मुभा Education News

Education News:शालेय रेकॉर्डमध्ये झालेल्या नावाच्या किंवा जन्मतारखेच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना भविष्यात अनेक सरकारी कामांसाठी आणि उच्च शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड किंवा नोकरीच्या अविळी ही चूक गंभीर अडवळा निर्माण करते.

त्यामुळे, ही चूक वेळेत सुधारण अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण विभागाच्या नियमांनुसार, शालेय नोंदीमध्ये नावामध्ये किंवा जन्मतारखेत बदल करण्यासाठी एक विशिष्ट मर्यादा ठरवून दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शालेय नोंदींमध्येच बदल करता येतो. एकदा विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आणि बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाल्यावर सहसा त्या नोंदींमध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येत नाही. दुरुस्तीची प्रक्रिया ही विद्यार्थ्यांला किंवा पालकांना थेट करता येत नाही, तर ती संबंधित शाळेमार्फतव करावी लागते.

सर्वप्रथम पालकांनी चूक दुरुस्त करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे लेखी अर्ज करावा लागतो. पालकांच्या अर्जानुसार शाळेत ठराव पास करून दुरुस्तीची शिफारस केली जाते. शाळेने ठराव आणि खालील समर्थक कागदपत्रांसह संपूर्ण प्रस्ताव तयार करावा लागतो.

१० पर्यंत

दुरुस्तीची प्रक्रिया शाळेमार्फतच करावी लागते शालेय रेकॉर्डमध्ये काय अन् कशामुळे होतात चुका?स्पष्टीकरण प्रवेशावेळी घाई: प्रवेशावेळी पालकांनी दिलेली कागदपत्रे आणि तोंडी माहितीच्या आधारे नोंदी करताना स्पेलिंगच्या चुका होतात. हस्तलिखितातील त्रुटीशाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये हाताने नोंदी करताना लिपिकांकडून जन्मतारीख, आई-वडिलांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका होतात.

टीसीमधील विसंगती: एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना, मागील शाळेच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटवरील नोंदीतच चूक असल्यास, ती नवीन शाळेत तशीच नोंदवली जाते. जन्मदाखल्याच्या वेळी अनेक पालक जन्म नोंदणी प्रमाणपत्राऐवजी इतर कागदपत्रे देतात, ज्यामुळे नोंदीमध्ये फरक राहतो.

रेकॉर्डमध्ये बदलाची पद्धत आणि कागदपत्रे कोणती?

पालकांकडून चूक दुरुस्त करण्यासंबंधी शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखी अर्ज सादर करणे. शाळेच्या व्यवस्थापनाने दुरुस्तीसाठी ठराव पास करून शिफारस करणे. जन्म नोंदणी प्रमाणपत्र, शाळेच्या पहिल्या दाखल्याची प्रमाणित प्रत, मागील शाळेचे ट्रान्सफर सर्टिफिकेट, नावामध्ये मोठा बदल असल्यास, दोन राष्ट्रीयीकृत दैनिकांमधील जाहीर प्रकटनाची प्रत.

शालेय नोंदींमध्येच बदल करता येतो. एकदा विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आणि बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाल्यावर सहसा त्या नोंदींमध्ये कोणताही दुरुस्ती करता येत नाही.

नाव, जन्मतारखेत बदलाची पद्धत कशी काय असते ?

दहावी प्रमाणपत्र मिळाल्यावर त्यात बदल करायचा असल्यास, विद्यार्थ्यांला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे विशेष अर्ज करावा लागतो. यासाठी राजपत्रमध्ये नाव बदलाची नोंद, प्रथम श्रेणी दंडाधिकाऱ्यांचे शपथपत्र आणि इतर कठोर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. बोर्डाकडून ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते.

दहावीच्या प्रमाणपत्रावर येणारे नाव अंतिम असते

विद्यार्थ्यांच्या दहावीच्या बोर्डाच्या प्रमाणपत्रावर जे नाव आणि अन्मतारीख छापून येते, तीच कायदेशीरदृष्ट्या अंतिम मानली जाते. भविष्यात सर्व सरकारी कामांसाठी, पासपोर्ट, उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी हे प्रमाणपत्र आधारभूत ठरते.

पालकांनी आपल्या पाल्याच्या शाळेतील नोंदी तपासण्यात अजिबात हयगय करू नये. भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी प्रवेशाच्या वेळीच आवश्यक ती काळजी घेणे आणि कागदपत्रे योग्य आहेत, याची खात्री करणे अनिवार्य आहे

डॉ. किरण कुंवर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प., धुळे

शालेय रेकॉर्ड बदलांना कुणाकडून मिळते मंजुरी ?

शालेय रेकॉर्डमधील बदलांना शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी (उदा. शिक्षणाधिकारी-प्राथमिक/माध्यमिक) प्रस्तावाची पडताळणी करून अंतिम मंजुरी देतात.

तर कधीपर्यंत रेकॉर्डमध्ये करता येत असतो बदल?

विद्यार्थ्यांच्या शालेय नोंदीमध्ये पहिली ते दहावीच्या वर्गापर्यंत बदल करण्याची मुभा असते. दहावीचा निकाल लागल्याव किंवा बोडर्डाचे प्रमाणपत्र मिळाल्यावर सहसा नोंदीत बदल करणे शक्य नसते.

कुठे आणि कसा अर्ज सादर करायचा?

शाळेमार्फत, संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडे अर्ज सादर करावा लागतो. पालक थेट अर्ज करू शकत नाहीत. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा लिपिक हे आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव शिक्षण विभागाकडे जमा करतात.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment